औरंगाबाद- गावठी कट्ट्याच्या धाकावर भरदिवसा लूटमार करणाऱ्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि रोकड जप्त करण्यात आली.
गावठी कट्ट्याचा धाक दाखवत लूटणारे तिघे गजाआड - रूग्णालय
गावठी कट्ट्याच्या धाकावर भरदिवसा लूटमार करणाऱ्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि रोकड जप्त करण्यात आली.
भरत उर्फ भुऱ्या दादाराव वाघ, कुणाल उर्फ हँडसम प्रदीप सोनकांबळे, शेख शफीक उर्फ शफ्या शेख मुसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हुसेन कॉलनीतील संतोष रामदास कांबळे हे कपडे घेण्यासाठी पुंडलीकनगर रोडकडे पायी जात होते. दरम्यान, तिघांनी त्यांना अडवत मारहाण केली आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवत ९ हजार लुटले. या मारहाणीत वाघ हे जखमी झाले.
त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिन्ही आरोपींना अटक करीत लुटलेली रोकड आणि एक गावठी कट्टा जप्त केला आहे.