औरंगाबाद- केंद्र सरकारने कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन शेतकरी विरोधी तीन काळे कायदे बनवले आहेत. ते काळे कायदे रद्द व्हावेत आणि एमएसपी हा नवा कायदा तयार करण्यात यावा यासाठी किसान मोर्चाच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे सरकार विरोधात निदर्शने करत रस्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे बनवले आहेत. ते काळे कायदे रद्द व्हावेत आणि एमएसपी हा नवा कायदा तयार करण्यात यावा या मागणीसाठी क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आलीय यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सभेला कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. भगवान भोजने, चंद्रकांत चव्हाण, बुद्धिनाथ बरळ, भिमराव बनसोड, रघुनाथ पाटील, लक्ष्मण साकरुडकर, लोकेश कांबळे आदींनी संबोधित केले.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील शेतकरी गेल्या 10 महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शांततेने धरणे धरून बसले आहेत. या आंदोलनास आतापर्यंत किमान 700 शेतकरी शहीद झाले आहेत. देशभर पसरत चाललेल्या या शेतकरी आंदोलनाने ग्रामीण कष्टकरी, शहरी बेरोजगार या शिवाय आदिवासी स्त्रीया व विद्यार्थ्यांना संघटित होण्याची हाक दिली आहे. हे शेतकरी आंदोलन आता केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहिले नसून ते देशातील तमाम कामगार, कष्टकरी व शोषित पिडीत जनतेचे आंदोलन बनले असल्याचे यावेळी किसान मोर्चाने सांगितले.
या होत्या मागण्या होत्या..
१)शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करा.