औरंगाबाद -कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर शहरात पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून घरीच राहण्याचा सल्ला दिला.
औरंगाबाद शहरात संचारबंदीचे आदेश मिळाल्यापासून प्रत्येक मुख्य रस्त्यावर पोलीस सेवा देत आहेत. या कालावधीत अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवार पासूनच बाजार पेठ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादमध्ये जवळपास 80 टक्के व्यवहार बंद करण्यात आले. जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रविवारी रात्री अनेक नागरिक घराच्या बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.