महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल

वैभव याच्याशी पीडित महिलेची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यामुळे दोघेही फोनवर बोलू लागले. यावेळी पीडितेने त्याच्याकडून १० हजार रुपये व्याजाने घेतले.

physical abused on married woman
विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By

Published : Oct 16, 2021, 8:05 PM IST

औरंगाबाद - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या २३ वर्षीय विवाहितेला २७ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव आनंद पवार (वय-२७, रा. उत्तमनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

घटना काय?

वैभव याच्याशी पीडित महिलेची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यामुळे दोघेही फोनवर बोलू लागले. यावेळी पीडितेने त्याच्याकडून १० हजार रुपये व्याजाने घेतले. दरम्यान, ४ जुलै रोजी रात्री आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वारंवार लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी पीडितेने आरोपीला फोन करून लग्नाबद्दल विचारणा केली तर एका मुलीसोबत त्याचे पहिल्यापासून संबंध असल्याचे त्याने सांगितले. तसेच पीडितेशी वाद घालून त्या मुलीशिवाय तो जगू शकत नाही. यानंतर पुन्हा फोन करायचा नाही, अशी धमकी देऊन त्याने फोन बंद केला. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -कोरोना लस घेण्याकरिता टाळाटाळ; नाग दाखवून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविले!

पीडिता पतीपासून विभक्त -

२३ वर्षीय विवाहितेचा, २३ सप्टेंबर २०१८ रोजी तिचा विवाह झाला होता. तिला मुलगा असून तिचे सासरच्या लोकांशी पटत नसल्याने ती पतीसह दुसरीकडे राहू लागली. तरीही दोघांचे पटत नसल्याने पीडिता मुलासह पतीपासून विभक्त राहू लागली. तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details