महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - mukundwadi police station

पहिल्या पत्नीला सोडून देऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार अत्याचार करीत होता. दरम्यान घरमालकाचा मुलगा अमोल पवार याने ऑगस्ट २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडीलांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By

Published : Feb 25, 2022, 10:51 AM IST

औरंंगाबाद - भाडेकरूच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून घरमालकाच्या २७ वर्षीय मुलाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल सुभाष पवार ( वय २७, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी ) असे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या तरूणाचे नाव आहे. पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह अमोल पवार याच्या वाड्यात भाडेकरू म्हणून राहते. आरोपी अमोल पवार याचा विवाह झालेला असून, त्याला दोन मुले आहेत. पिडीता ही त्याच्या मुलांना खेळविण्यास येत होती. तेव्हा अमोल तिला पहिल्या पत्नीला सोडून देऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून वारंवार अत्याचार करीत होता. दरम्यान घरमालकाचा मुलगा अमोल पवार याने ऑगस्ट २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडीलांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

घाबरलेल्या पीडितेला धीर देत अमोल पवार याच्याविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बलाकात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details