औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे एका 30 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर नराधमाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन महेर (रा. पळशी, ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भावाकडे आल्याने झाली महिलेशी ओळख
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित महिला ही पालखेड येथील रहिवासी आहे. ती सध्या औरंगाबाद येथे पती व मुलांसोबत राहते. ती सुमारे चार महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनी परिसरात तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी पवन महेर हा त्याचा भाऊ जीवन महेर याच्या घरी आला होता. यावेळी तेथे त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. सुमारे महिनाभरानंतर पवन याचा भाऊ जीवन व मामाच्या मध्यस्थीने महिलेने पवन याला एका महिन्याच्या वायद्यावर 45 हजार रुपये हात उसने म्हणून दिले होते. महिनाभरानंतर महिलेने पवनकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र, पवनने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित महिलेने पवन, त्याचा भाऊ व मामा यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.