महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्या वाहनाचं काय करायचं याची काळजी सोडा; ई वाहनामध्ये करता येणार रुपांतर, संभाजीनगरच्या तरुणानं शोधलं अनोखं तंत्रज्ञान - मोबाईल चार्जिंग

Petrol Vehicle into E Vehicle : आपली वाहनं जुनी झाल्यावर त्याचं काय करावं हा प्रश्न वाहनधारकांना सतावत असतो. ही समस्या लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं या इंधनावरील वाहनाचं रुपांतर ई वाहनांत करण्याचं तंत्रज्ञान विकसीत केलंय.

Petrol Vehicle into E Vehicle
Petrol Vehicle into E Vehicle

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 12:34 PM IST

Updated : Jan 19, 2024, 1:08 PM IST

छत्रपती संभाजीनगर Petrol Vehicle into E Vehicle : सध्या ई वाहनांची मागणी प्रचंड वाढलीय. त्यांच्या किंमती पाहता इच्छा असूनही अनेकांना ही वाहनं घेणं शक्य होत नाही. त्यातच जुन्या वाहांनाचं करायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. यावर पर्याय म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील युवकानं जुन्या भंगारमध्ये जाणाऱ्या वाहनांना ई वाहनात परिवर्तित करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. वाळूज भागात प्रायोगित तत्त्वावर काही वाहनं तयार करण्यात आली असून त्याबाबत शासनाची परवानगी मिळवली असून लवकरच चारचाकी वाहनात देखील हे तंत्रज्ञान वापरण्याचा मानस असल्याचं हे तत्रज्ञान विकसीत करणाऱ्या युवकानं सांगितलंय. दानिश चावडा असं या युवकाचं नाव आहे.

आता आपली जुनी वाहनं धावतील बॅटरीवर : मागील काही वर्षात इंधन बचत करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी ई वाहनांचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र ई दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञानात सर्वसामान्यांच्या आवाक्यात बसत नसल्याचं पाहायला मिळालंय. त्याच बरोबर घरी असलेल्या जुन्या वाहनांचं काय करावं हा देखील प्रश्न पडतो. त्यामुळं इच्छा असूनही बहुतांश लोक ई वाहन घेत नाहीत. मात्र त्यावर पर्याय म्हणून शहरातील दानिश चावडा या युवकानं नवीन तंत्रज्ञान विकसीत करुन जुन्या वाहनांना ई वाहनात परावर्तित करण्याचा नवीन व्यवसाय उभारलाय. त्यामुळं जास्त पैसे न खर्च करता आपलं आहे ते जुनं वाहन ई वाहन म्हणून वापरता येणार असल्याचा दावा दानिशनं केलाय.

भंगार वाहनासाठी यंत्रणा उपयुक्त : इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं आयुष्य पंधरा वर्षे शासनानं निर्धारित केलेलं आहे. त्यामुळं त्यांनतर त्यांच्या इंजिन मधून पर्यावरणाला हानी कारक धूर निघतोय का या बाबत तपासणी करून नव्याने नोंदणी केली जाते. मात्र वाहन जुनं झाल्यानं त्याचं एव्हरेज कमी झालेलं असतं. तर दुसरीकडं गाडी जुनी झाल्याचं त्याचे सामान देखील उपलब्ध होत नसल्यानं वाहनचालकाला नवं वाहन घेण्याची इच्छा होते. त्यात आता वाहनांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि जुनी वाहनं भंगारात देण्याची वेळ येते. त्याला नवीन तंत्रज्ञानाचा पर्याय उपयुक्त ठरेल असा आशावाद युवा उद्योजक दानिश चावडा यानं व्यक्त केलाय.



कमी खर्चात वाहनात बदल होईल शक्य :जुनी वाहनं ई वाहनांत परिवर्तित करताना काही बदल करावे लागतात. वाहनाचं इंधन इंजिन पूर्णतः काढून टाकलं जातं. त्यानंतर त्यात मोटर आणि बॅटरी बसवण्यासाठी काही बदल वेल्डिंगच्या साहाय्यानं केले जातात. त्यानंतर मोटार आणि बॅटरी बसवून गाडी ई वाहनात रुपांतरीत होते. हा बदल करण्यासाठी मोपेडसाठी 40 हजार तर बाईकसाठी 45 ते 50 हजारांचा खर्च लागणार आहे. एका वाहनात बदल करण्यासाठी जवळपास दोन ते तीन आठवडे इतका कालावधी लागणार असून परिवहन विभागाच्या नियमात हे काम केलं जाईल. तशी नोंद करुन नवीन कागदपत्रं तयार होतील. गाडीला मिळालेला नंबर मात्र बदलणार नाही, असं देखील व्यावसायिक दानिश चावडा यानं सांगितलंय. दुचाकी वाहनांची चाचणी झाली असून नवीन तंत्रज्ञान नुसार वाहानला रिव्हर्स, ब्लू टूथ, मोबाईल चार्जिंग पर्याय असणार असून लवकरच जुन्या चारचाकी वाहनांना ई वाहनात परिवर्तित करण्याचा मानस असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. बांबूनं आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती
  2. काय सांगता! कोल्हापुरातील बाप लेकांनी बनवला अनोखा 'नॅपकिन बुके'
Last Updated : Jan 19, 2024, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details