महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील नावडीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट - सुसाईड न्यूज कन्नड

ज्ञानेश्वर जगनाथ वाकळे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

suicide
आत्महत्या

By

Published : Jan 2, 2020, 9:44 AM IST

औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील नावडी येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्ञानेश्वर जगनाथ वाकळे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शेतातील जनावरांच्या गोठ्यात लाकडी बांबूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा -कन्नड तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू; प्रशासनाचा कानाडोळा

घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळताच बीट जमादार आर यू बोंदरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details