औरंगाबाद -गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे पोलीस आणि डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वैजापूर तालुक्यात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. वैजापूर येथे दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला जात आहे. हा लॉकडाऊन लोकप्रतिनिधींनी पुकारला आहे. दोन दिवसांमध्ये पोलीस आणि डॉक्टरांना आराम देण्यात आला आहे. नाकाबंदीत पोलिसांऐवजी लोकप्रतिनिधी तर सरकारी डॉक्टरांऐवजी खासगी डॉक्टर दोन दिवस काम पाहणार आहेत. शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवायला सुरुवात झाली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा उपक्रम राबवला जाणार असून पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
वैजापूर येथे डॉक्टर, पोलिसांना दोन दिवस सुट्टी, लोकप्रतिनिधींनी सांभाळली जबाबदारी - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज
लोकप्रतिनिधींनी दिवसभर सर्व वैजापूरच्या चौकांमध्ये आणि तालुक्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी आणि मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पोलीस आणि डॉक्टरांवर येणारा ताण काहीसा कमी होईल, असा विश्वास आमदार प्रा रमेश बोरणारे यांनी व्यक्त केला.
9 आणि 10 मे रोजी वैजापूर येथे दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण वैजापूर शहर व ग्रामीण भाग शंभर टक्के (लॉकडाऊन) बंद ठेवण्यात आला आहे, तेही सर्व पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर, कर्मचारी यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात खासगी डॉक्टर स्वेच्छा सेवा देत आहेत, तर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनादेखील सट्टी देऊन त्यांच्या जागी चेकपोस्टवर व चौफुलीवर लोकप्रतिनिधी आणि युवकांनी कर्तव्य बजावले आहे.
दिवसभर आमदार प्रा, रमेश बोरणारे यांच्यासह उपनगराध्यक्ष साबेरभाई, तहसीलदार गिरगे साहेब, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, मा.न.दिनेश परदेशी, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, राजेंद्र साळुंके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी दिवसभर सर्व वैजापूरच्या चौकांमध्ये आणि तालुक्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी आणि मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पोलीस आणि डॉक्टरांवर येणारा ताण काहीसा कमी होईल, असा विश्वास आमदार प्रा रमेश बोरणारे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत वैजापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत. ही चांगली बाब असून तालुका निरोगी ठेवण्यास या उपक्रमामुळे पोलिसांना मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.