औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील पिशोर व परिसरात कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, महसूल कर्मचारी या तिन्ही प्रशासनाचे कमर्चारी हे रात्रंदिवस परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून मागील काही दिवसांपासून काम करीत असल्याचे दिसत आहे. पिशोर पोलीस, आरोग्य विभाग, तहसील विभाग व इतर प्रशासनाचे कर्मचारी यांना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता प्रशासनाने यादरम्यान पिशोर येथील महादेव मंदिर परिसरातील झोपडपट्टी परिसरातील मुस्लीम महिला व बांधवांच्या पुढाकाराने त्यांच्या या चांगल्या कामाचा गौरव म्हणून येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, पिशोर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.धीरज पाटील, तलाठी दिपाली बागुल, यांच्यासह पोलीस कर्मचारी, शासकीय रुग्णालय कर्मचारी, महसूल कर्मचारी यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केले.
प्रशासनिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पृष्पवृष्टी; नागरिकांनी मानले आभार - aurangabad news
पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, पिशोर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.धीरज पाटील, तलाठी दिपाली बागुल, यांच्यासह पोलीस कर्मचारी, शासकीय रुग्णालय कर्मचारी, महसूल कर्मचारी यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केले.
विषाणुचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगल्या प्रकारे खबरदारी घेतली. आतापर्यंत एकही रुग्ण कन्नडसारख्या शहरात नाही तर ग्रामीण भागातसुद्धा आढळला नाही. रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले म्हणून या भागात प्रशासनाने गावात जाऊन आढावा घेतला. तेव्हा त्यांचे स्वागत पुष्पवृष्टी व टाळ्या वाजून केले. अधिकारी कर्मचारी वर्गानि नागरिकांचे आभार मानले.