औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले. त्यामुळे परिसरातील जवळपास ४० गावातील ग्रामस्थ बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. सर्वजण टायफाईड, मलेरिया, सर्दी, खोकला, वांत्या-जुलाब, अंग दुखणे, अशक्तपणा, अशा अनेक आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून आले.
पैठणमध्ये साथीच्या आजारांचे थैमान, २ दिवसात १७० रुग्ण दाखल हे वाचलं का? - पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून 'असा' करा बचाव - डॉ अविनाश भोंडवे
ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही साथ उद्भवली असल्याचे बिडकीन ग्रामीण वैद्यकीय अधिकारी अंजली देशपांडे यांनी सांगितले. शौचानंतर हात न धुणे, उघड्यावरचे खाणे, आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ न ठेवणे, पावसामुळे साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न करणे यासारख्या कारणांमुळे ही साथ पसरली असल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हे साथीचे प्रमाण वाढले असल्याचेही त्या म्हणाल्या.
हे वाचलं का? - पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरकार करोडो रुपये खर्च करत असते. मात्र, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड सारख्या आजारावर अद्यापही ग्रामीण भागात नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. बिडकीन पंचक्रोशीतील जवळपास 170 रुग्णांनी गेल्या २ दिवसात उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालय गाठले. रुग्ण अंगदुखी, सर्दी, खोकला अशी तक्रार करत असेल, तर डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, रुग्णांची रक्त तपासणी आणि लघवी तपासणीचा अहवाल आल्याशिवाय आजाराचे निदान लावणे शक्य होत नसल्याचे देशपांडे म्हणाल्या.