औरंगाबाद - पवार कधी कोणाला कळाले नाही आणि कळणार देखील नाही. एकत्रित काम करणे म्हणजेच पवार आणि ते तसेच शेवटपर्यंत एकत्रच राहतील, असे विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औरंगाबादेत केले. औरंगाबादच्या महाएक्सपो कार्यक्रमात युवकांशी रोहित पवार आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी युवकांनी नोकरी शिवाय व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला दिला.
आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया... हेही वाचा.... 'फडणवीसांचे सर्व अंदाज चुकतात, त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा'
बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत होत असताना, पवार कुटुंबातील कोणतेही सदस्य उपस्थित नसल्याने चर्चा सुरू झाली. याबाबत रोहित यांना विचारले असता, त्यांनी याचे स्पष्टीकरण दिले. काही लोकांना काम नसतात, तेच असा पद्धतीने चर्चा सुरू करतात. दादांचे स्वागत होत असताना, तो कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता. त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात नागरिकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी दादांनीच जनतेची कामे महत्वाची असतात. सत्कार हा वैयक्तिक आहे. त्यामुळे तू तुझे काम कर, असे म्हटल्याने मी गेलो नाही. मात्र पवार कधी कोणाला समजले नाहीत आणि समजणार नाहीत, असे रोहित पवार यांनी या चर्चेवर उत्तर देताना म्हटले आहे.
हेही वाचा... साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन
सारथी सुरू झाली पाहिजे. तिला ताकद दिली पाहिजे अशी, भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. सारथी सुरू करायला काही अडचणी आहेत. दोन अधिकाऱ्यांमधील वाद म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणीत आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. सुप्रियाताई, आम्ही सर्व याचा पाठपुरावा घेत आहोत. बार्टी, ज्योती आणि सारथी सारख्या योजनांचा फायदा गोरगरीब मुलांना झाला पाहिजे. संभाजीराजे उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाची सरकार गंभीर दखल घेईल आणि सारथी सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा... 'सारथी' बचावसाठी मराठा समाज संघटना आक्रमक, पुण्यात लाक्षणिक उपोषण
शेतकरी आत्महत्या बाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. आत्महत्येची काही वेगवेगळी कारण आहेत. त्यामध्ये शासकीय उपाय योजना कमी पडत आहेत. हे देखील कारण होऊ शकते. मात्र, आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकार योग्य पाऊल उचलले, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. आजची शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. प्रात्यक्षिक अभ्यासक्रम सुरू केले तर पुढच्या पुढील त्याचा फायदा होईल. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना आपण त्याबाबत भेटून काही बदल करता आले तर करा, अशी विनंती करणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.