औरंगाबाद- यंदा लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची उपासमार होत आहे. त्यातच निकृष्ट दर्जाची डाळ वितरण करून प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यात समोर आले आहे. तालुक्यातील उपळी येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची हरभरा डाळ गोरगरीब जनतेला वितरित करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला आहे. या दाळीचा भुगा झाला आहे. जनावरेही खाणार नाही अशी दाळ नागरिकांना वितरित केल्याने गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सिल्लोड तालुक्यात स्वतः धान्य दुकानातून नागरिकांना मिळाली निकृष्ट दर्जाची डाळ - सिल्लोड न्यूज
यंदा लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची उपासमार होत आहे. त्यातच निकृष्ट दर्जाची डाळ वितरण करून प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यात समोर आले आहे. तालुक्यातील उपळी येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची हरभरा डाळ गोरगरीब जनतेला वितरित करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला आहे.
डाळ
प्रशासनाची भूमिका-
या संदर्भात पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की निकृष्ट दर्जाची दाळ परत मागवून घेण्यात येणार असून नागरिकांना चांगली दाळ लवकरच देण्यात येईल.