औरंगाबाद - जिल्ह्यातील कन्नड शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सर्वत्र संचारबंदी लागू असताना काम नसताना विनाकारण फिरणाऱ्या बेफिकिर नागरिकांना न्यायालयाने दंड ठोकला आहे.
कन्नड येथे संचारबंदीचे उल्लंघन, ३२ जणांवर दंडात्मक कारवाई - corona in maharashtra
शहर पोलीस ठाणे अंतर्गत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३२ जणांविरुध्द आत्तापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्वांना न्यायलयासमोर हजर केले असता १९ हजार ५०० रुपये इतका दंड ठोठावण्यात आला.
![कन्नड येथे संचारबंदीचे उल्लंघन, ३२ जणांवर दंडात्मक कारवाई कन्नड येथे संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या ३२ जणाना दंड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6718661-145-6718661-1586399746164.jpg)
शहर पोलीस ठाणे अंतर्गत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३२ जणांविरुध्द आत्तापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्वांना न्यायलयासमोर हजर केले असता १९ हजार ५०० रुपये इतका दंड ठोठावण्यात आला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी शहरात विनाकारण घराबाहेर न पडता आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी 'आम्ही आपल्या व आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावर असून तुम्ही घरात बसून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे' असे आहवानदेखील केले आहे.