औरंगाबाद -कोरोनासाठी उपचार घेतल्यावरही सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर साधारणपणे 15 दिवस ते महिन्याच्या आत याची लक्षणे दिसतात. मात्र, सध्या याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये याची भीती पहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना दातांचे तज्ञ डॉ. भगवान राख दातांवर होतो सर्वात पहिले आघात -
म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची चिंता अधिक वाढली आहे. हा आजार आधी दातांवर आघात करत असल्याने दातांच्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची गर्दी वाढत चालली आहे. कोरोनाचे उपचार झाल्यावर पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये याची लक्षण दिसू लागतात. दात हलणे, हिर्डीला सूज येणे, दात दुखणे अशी लक्षण दिसून येतात. त्यावेळी तातडीने तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असे मत दातांचे तज्ञ डॉ. भगवान राख यांनी व्यक्त केले.
म्युकर मायकोसिसमुळे वरचा जबडा होतो निकामी -
म्युकरमायकोसिमध्ये नाकापासून लक्षण दिसायला सुरुवात होते. बुरशीजन्य आजारामुळे सर्वात आधी नाक दुखणे, नाकातून पाणी गळणे, अशी लक्षणे दिसून आल्यावर त्यानंतर हा आजार दातांवर हल्ला करतो. यात प्रामुख्याने वरचा जबडा दुखतो. त्यावर तातडीने उपचार घेतले नाही तर रुग्णाचा वरचा जबडा काढावा लागतो. त्यामुळे कायमचा जबडा गमावण्याची वेळ रुग्णांवर येऊ शकते, अशी भीती दातांचे तज्ञ डॉ. भगवान राख यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -कॅन्सरग्रस्त महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी नाशिकातील तरुणींनी केले केसदान
डॉक्टरांकडे नागरिकांची पळापळ -
म्युकर मायकोसिसची भितीमुळे डोळे, दातांच्या दवाखान्यात रुग्णांची तपासणीसाठी गर्दी वाढली आहे. म्युकर मायकोसिसमुळे सध्या अनेक लोक आजारी पडलेले दिसत आहेत. रुग्णांचे जबडे, दात, डोळेसुद्धा काढण्याची वेळ या रुग्णांवर येत आहे. तर काहींचा मृत्यू झाल्याचेही पाहायला मिळत आहे. जवळपास प्रत्येक तिसरा रुग्ण याच भिती पोटी दवाखान्यात येत असल्याचे नेत्रतज्ञ सांगत आहेत. कोविड बरा झाल्यावर हा आजार पहिल्या 15 ते 25 दिवसांतच होतो. शुगर वाढलेले रुग्ण, जास्त स्टेरॉईड उपाचारावेळी वापरलेले रुग्णांनाच याचा धोका जास्त आहे. त्यामुळे न घाबरता सामोरे जाणे हाच यावरील उपाय आहे, असा सल्ला नेत्रतज्ञ डॉ. राजीव मुंदडा यांनी दिली.
हेही वाचा -गोव्यात म्युकरमायकोसिसने एकाचा मृत्यू; आणखी 6 जणांना लागण