औरंगाबाद-हाथरस हत्याकांडाप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला वंचित बहुजन आघाडी तर्फे काळ्या चपलांच्या हाराचे पार्सल पाठवण्यात आले. शुक्रवारी मुख्य पोस्ट ऑफिस समोर योगी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काळ्या चपलांचा हार असलेले पार्सल पाठवण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे पीडितेवर अत्याचार करत, तिला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. याच घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख संदीप शिरसाट, जमिल देशमुख यांनी मुख्य पोस्ट कार्यालयासमोर घोषणा बाजी केली आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळ्या चपलांच्या हाराचे पार्सल पाठवले. त्याबरोबर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याचीही मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीने उत्तर प्रदेश सरकारला पाठविले काळ्या चपलांच्या हाराचे पार्सल - vanchit Bahujan city chief Sandeep Shirsat
हाथरस हत्याकांडाप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला वंचित बहुजन आघाडी तर्फे काळ्या चपलांच्या हाराचे पार्सल पाठवण्यात आले. शुक्रवारी औरंगाबादच्या मुख्य पोस्ट ऑफिससमोर योगी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद
देशातील सवर्ण आणि दलित यांच्यात दरी निर्माण करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न होत, असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष लता बामणे, वंदना नखडे, मनोज वाहुळ, अनिल जाधव, नितीन भुईगळ, जयश्री शिर्के, भोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.