औरंगाबाद- पाण्याच्या मागणीसाठी पैठणचे शेतकरी आक्रमक झाले असताना आता परभणीच्या शेतकऱ्यांनी देखील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणीचे शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले.
पाण्यासाठी परभणीचे शेतकरी आक्रमक, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात घुसून आंदोलन - parbhani
शेतकऱ्यांनी थेट मुख्य अभियंत्यांच्या टेबलवर बसून भाकरी भाजी खात आंदोलन केले. पाण्याची गरज असल्याने तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणीच्या शेतकऱ्यांनी गोदावरी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, जायकवाडी धरणाचा पाणीसाठी मृत अवस्थेत गेल्याने पाणी सोडणे शक्य नसल्याच अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात पैठण तालुक्यातील शेतकरी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असताना परभणीच्या शेतकऱ्यांनीदेखील आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांनी थेट मुख्य अभियंत्यांच्या टेबलवर बसून भाकरी भाजी खात आंदोलन केले. पाण्याची गरज असल्याने तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.