महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve : अब्दुल सत्तार यांना विरोध, भाजप कार्यकर्त्यांनी केले दानवे यांचे स्वागत; तर 'या' चर्चेला पूर्णविराम - Raosaheb Danve Reaction

अजिंठा येथील जनजागृती कार्यक्रम कृषिमंत्री अब्दुल सत्तार जाहीर कार्यक्रमात सत्कार नको असे म्हणत असताना, भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारात, त्यांच्या नाकावर टिच्चून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कार केला. तसेच यावेळी आमच्या विचारांशी सहमत असलेल्यांनी सोबत यावे, मात्र सूत्रे आमच्याकडेच राहतील असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. तर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Raosaheb Danve and Abdul Sattar
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By

Published : Jul 7, 2023, 7:16 PM IST

माहिती देताना रावसाहेब दानवे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :राजकीय नेत्यांमध्ये चांगले संबंध असले तरी कार्यकर्ते हे मात्र आपल्या नेत्यांचे कट्टर भक्त असतात, ते कोणाचेही ऐकत नाही असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय अजिंठा येथील कार्यक्रमात आला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर कार्यक्रमात सत्कार नको असे म्हणत असताना भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारात, त्यांच्या नाकावर टिच्चून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कार केला. शेवटी सत्तार यांना शांत बसावे लागले, तर दानवे यांनी अब्दुल सत्तार यांचा देखील सत्कार करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सत्तार यांचा केला विरोध :भारत सरकार, खान मंत्रालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम अजिंठा येथे आयोजित केला होता. कार्यक्रम तसा सकाळी अकरा वाजता नियोजित होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र वेळेवर आले तर नेते कसले, सवयी प्रमाणे दोन्ही नेते तीन तास उशिरा आले.

रावसाहेब दानवे यांचे केले स्वागत: उशीर झाल्यामुळे त्यांना जाण्याची देखील घाई होती. त्यामुळे आता सत्कार नको कार्यक्रम सुरू करा असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. मात्र त्यावर भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाच्या खालून असे चालणार नाही, आम्ही दानवे साहेबांचे स्वागत करणार असे म्हणत व्यासपीठावर चढले. त्यानंतर एकामागे एक कार्यकर्त्यांनी दानवे यांचे स्वागत केले. त्यावेळी दानवे यांनी सत्तार यांचेपण स्वागत करा असे ते म्हणाले. काही कार्यकर्त्यांनी त्यांचेपण स्वागत केले.



भाजप कार्यकर्ते सत्तार यांच्या विरोधात : कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्ये मोठे वाद आहेत. सत्तार काँग्रेस पक्षात असताना त्यांनी केलेली टीका आणि कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक यामुळे, भाजप कार्यकर्ते नेहमीच विरोधात असतात. त्यात 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचा हक्काचा मतदार संघ सिल्लोड युतीमध्ये शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तार यांना दिला. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी वारंवार वरिष्ठ नेत्यांना यापुढे सत्तार यांना पाठिंबा नकोच अशी भूमिका घेतली. मागील चार वर्षात रोष वाढला असल्याचे अनेकवेळा दिसून आले. त्यात जाहीर कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेला रोष त्याचेच प्रतीक मानले जात आहे.



कोणताही नाराजी नाही :दुसरीकडेराष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याने एकनाथ शिंदे गट शिवसेना नाराज असल्याचे समोर आले आहे. मात्र असे काहीच नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. आधी चाळीस आमदार सोबत आले आता आणखी चाळीस आले. सरकार मजबूत झाले असून दुखावलेले लोक अशा बातम्या पसरवतात असा आरोप त्यांनी केला. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य असेल त्यांच्यासाठी आमचे दार उघडे आहेत. मात्र आल्यावर आमचे सूत्र मान्य झाले तर ते शक्य होईल.



पंकजा यांच्या बाबत बातम्या पसरवल्या जातात : पंकजा मुंडे यांच्या बाबत बातम्या पसरवाणारे अनेक लोक आहेत. त्याबाबत त्यांनी अनेकवेळा खुलासा केला. त्या ना बीआरएसमध्ये जाणार, ना पक्ष सोडणार आहेत. गोपीनाथ मुंडे आणि मी पक्षाचे आधीपासून सदस्य आहोत. त्यांची मुलगी पंकजा किंवा माझा मुलगा यांच्यासह ज्यांनी भाजप उभा करण्यासाठी प्रयत्न केले असे लोक कुठेही जाणार नाहीत. मात्र अफवा पसरवल्या जातात, त्या पेपरला येतात. मात्र त्याचा परिणाम कोणाच्या राजकीय जीवनावर होऊ नये असे आम्हाला वाटत असल्याचे सांगून, पंकजा मुंडे या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हेही वाचा -

  1. Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंचा एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला जबर धक्का
  2. Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वरून रात्री उशिरा पडले बाहेर, नवीन राजकीय खलबते
  3. Maharashtra Political crices : अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, बाकी सगळे अनधिकृत - प्रफुल्ल पटेल

ABOUT THE AUTHOR

...view details