महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळी राजधानी आहे का ? सभा आझाद मैदानावर घ्या, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला - bjp

औरंगाबादमध्ये आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजपचा कार्यकर्ता हाच खरा विजयाचा शिल्पकार आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्र्यांनी काय कामे केली हे मतदारांना सांगण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

By

Published : Feb 23, 2019, 3:56 PM IST

औरंगाबाद - येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झेंडा फडकवण्याची संधी देणार नसल्याचे वक्तव्य महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केले. सर्वत्र आपला विजय झाला आहे. आज परळीत राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेची समारोप सभा आहे. परळी काय राजधानी आहे का ? सभा आझाद मैदानावर घ्या, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंना टोला लगावला.


काही ठिकाणी किरकोळ पराभव झाला आहे. मात्र, निराश न होता कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. औरंगाबादमध्ये आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजपचा कार्यकर्ता हाच खरा विजयाचा शिल्पकार आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्र्यांनी काय कामे केली हे मतदारांना सांगण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी जर सरकारची कामे सांगितली नाहीत तर या मेळाव्यांना काही उपयोग नसल्याचे त्या म्हणाल्या. पदे बघायला सोपी आहेत मात्र, उपभोगायला अवघड असल्याचे त्या म्हणाल्या. आता सैनिकांवर झालेला हल्ला मोदीजी परतावून लावतील हा विश्वास आहे. पाया मजबूत असलेल सरकार असल्याचेही त्या म्हणाल्या.

भाजप मेळावा

आज परळीत राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेची समारोप सभा आहे. परळी काय राजधानी आहे का ? सभा आझाद मैदानावर घ्या असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंना टोला लगावला. येथे पहिल्यापेक्षा मोठा विजय भाजपला मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या. काही लोक यात्रा काढत आहेत आणि नाव संघर्षयात्रा देत आहेत. मात्र, यात्रा मुंडे साहेबांनी काढली होती. त्यावेळी परिवर्तन झालं. हे परिवर्तन यात्रा काढतात, गेली ७० वर्ष सत्ता तुमच्याकडे होती. काय केले असा प्रश्नही त्यानी विचारला. आमच्या सरकारला शौचालय बांधावे लागली तसेच आम्हालाच गॅस द्यावा लागल्याचे मुंडे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details