औरंगाबाद - जमिनीचा निकाल लावण्यासाठी एक लाख रुपयांची लाच हस्तकाच्या सहाय्याने स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या पथकाने तहसीलदार महेश सावंतला दोन हस्तकांसह अटक केली.
कैलास सोपान लिपणे आणि बद्रीनाथ भवर असे तहसीलदाराच्या खासगी हस्तकांची नावे आहेत. तक्रारदार शेतकऱ्याची 12 एकर कुळाच्या जमिनीचे प्रकरण तहसीलदार महेश सावंत यांच्या समोर सुरू होते. या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी सावंत यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली.