औरंगाबाद (पैठण) -राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने या कोणाच्या लाटेला रोखण्यासाठी पैठण तहसील प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवार 20 फेब्रुवारीला तहसील कार्यालय पैठण येथे कोरोना संदर्भात अनमोल सागर आय. ए. एस. उपविभागीय अधिकारी पैठण यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रकांत शेळके तहसीलदार पैठण यांचे उपस्थितीत सर्व महसूल प्रशासनाची बैठक घेण्यात आली.
पैठण तहसील प्रशासन कोरोनाच्या दुसरा लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज काय झाले निर्णय -
या बैठकीमध्ये दोन आठवडी बाजार बंद ठेवणे, मंगल कार्यालयात लग्नासाठी फक्त 50 लोकांची उपस्थिती, तहसिलदारांची लेखी परवानगी आवश्यक आहे, शिकवणी क्लासेस मध्ये विद्यार्थांची संख्या कमी करणे व सेनिटायझर ठेवणे तापमान तपासणे , मास्क वापरणे सर्व नागरिकांना बंधनकारक असून मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड होईल होणार आहे. सर्दी ताप खोकला असल्यास डाँक्टरांनी रूग्णाला कोरोना तपासणी करण्यास सांगणे, मंगल कार्यालय किवा क्लासेस वर छापा पडल्यास गुन्हे दाखल होतील आणि सिल करण्याची कारवाई होईल असे निर्णय घेण्यात आले आहेत.
पैठण तहसील प्रशासन कोरोनाच्या दुसरा लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज नायब तहसीलदारांनी केली जनजागृती -
ही बैठक होताच बैठकीत देण्यात आलेल्या सूचना व निर्णया संबंधीत जनजागृती करण्याता आली. या अभियानात नायब तहसीलदार संतोष अनर्थे सहभागी झाले होते. त्यांनी पाचोड,विहामांडवा, आडूळ येथील पाचोड मेनरोड, मार्केट, बसस्थानक व भाजी मंडई, मंगल कार्यालय येथे जनजागृती केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक कृष्णा कांबळे, तलाठी ठाकूर,कोतवाल होते. यावेळी त्यांनी नागिकांना दंड करण्याच्या सूचना करताच नागरिकांनी तात्काळ तोंडाला मास्क लावले आणि भिजिकल डिस्टन्स राखण्यास सुरुवात केली. ही मोहीम शासनाच्या पुढील आदेशा मीळेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी बाहेर निघताना मास्क कायम वापरावा, मास्क वापराल नाहीतर ₹. 500/- दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
पैठण तहसील प्रशासन कोरोनाच्या दुसरा लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज