औरंगाबाद -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पैठण शहर आणि तालुक्यात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील व्यापारी महासंघ व प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत येत्या मंगळवारपासून (14 जुलै) लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला.
काल आमदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. विजय कुमार वाघ, प्रपाठक डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. संदीप रगडे, आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष सुरज लोळगे, गटनेता तुषार पाटील, नगरसेवक हस्मुद्दिन कट्यारे, बाळू माने, महेश जोशी, सलीम शेख, जितू परदेशी, समाजसेवक, व्यापारी महासंघाचे व भाजप व्यापारी आघाडीचे काही पदाधिकारी उपस्थित होते.