महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निष्ठावंताना डावलल्याने पैठण राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम - Paithan new news

निष्ठावंताना डावलून आयारामांना तिकीट दिल्याने पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात संतापाची लाट उसळली होती. मात्र, अखेर पक्षातील नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला.

संजय वाकचोरे

By

Published : Oct 8, 2019, 3:12 PM IST

औरंगाबाद -जिल्ह्यातील पैठण विधासभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी भाजप युवक प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय राधाकिसन गोर्डे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली. यामुळे पैठण तालुक्यात राष्ट्रवादीच्या निष्ठावंताच्या गोटात पक्षाच्या निर्णयाविरोधा संतापाची लाट उसळली. राष्ट्रवाचीचे निष्ठावंत संजय वाकचोरे व महिली आघाडी तालुका अध्यक्ष अनिता गायकवाड यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.

यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही मागे राहिले नाहीत. त्यांनी सर्वात प्रथम संजय वाकचोरे यांनी अधिकृत असे प्रदेश अध्यक्षाचे पत्र देऊन सांगितले की, आयात केलेले दत्तात्रय गोर्डे यांना चुकून एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी वाकचोरे यांना देण्यात यावी. या पत्राच्या अशेवर पक्षाचे निष्ठावंत व आयाराम कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपल्यावर तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

एका निष्ठावंत युवक कार्यकर्त्याने चक्क आपल्या रक्तानेच प्रदेशाध्यक्षांना त्यांनी घेतलेल्या चुकीचा निर्णय मागे घेण्यासाठी पत्र लिहिले. महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अनिता वानखेडे यांनी उमेदवारी देण्यासंदर्भात निष्ठावंताचा कुठल्याही प्रकारचा विचार न घेता आयारामांना उमेदवारी दिल्याने आपल्या पदाचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देऊन सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे पत्रच दिले. संजय वाघचोरे यांना प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दत्तात्रय गोर्डे यांना उमेदवारी नजरचुकीने दिल्याच्या आशयाचे पत्र पैठण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी दरम्यान हे पत्र फेटाळत वाघचोरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

त्यामुळे वाघचोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक अधिकारी व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका मान्य केली.या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुणावनी करण्यात येणार आहे. पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून होत असलेल्या नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आता राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघाचोरे व कार्यकर्ते एनवेळेवर पक्षाने आयात केलेल्या उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांना मदत करतात की अन्य पक्ष विरोधी निर्णय घेतात हे बघणे गरजेचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details