औरंगाबाद- विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. मराठवाड्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले आहे. तर, 2014 मध्ये हा आकडा सरासरी 65 टक्क्यांपर्यंत होता. या निवडणुकीत मराठवाड्यात आघाडीला आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर युतीला यश मिळाले तर, औरंगाबादच्या एका जागेवर एमआयएमने विजय मिळवला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आघाडीला अपयश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात अस्तित्व 'टिकवण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आहे.
हेही वाचा -कुर्ल्यात पोलिसांवरील हल्ल्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात - नवाब मलिक
2014 ची आकडेवारी -
त्यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या.
- काँग्रेस - 9
- राष्ट्रवादी - 8
- शिवसेना - 11
- भाजप - 15
- इतर - 3
- एकूण जागा - 46
2014 ची राजकीय परिस्थिती -
2014 आधी म्हणजेच मोदी लाट येण्याआधी मराठवाड्यात कोणत्याही पक्षाचा दबदबा कायम राहिला नाही. 2009 च्या निवडणुकीत युतीला नाकारणाऱ्या मराठवाड्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपला भरभरून मतं दिलीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना - भाजपला 26 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, त्यानंतर पाच वर्षात अनेक अपक्ष भाजप - सेनेत दाखल झाले. त्यामुळे युतीच्या आमदारांची संख्या वाढली.