औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद घराचा मागचा दरवाजा तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरीची ही घटना १२ जानेवारीला भर दुपारी 1 ते 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. परसराम नामदेव नरवडे असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.
कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी - gold stolen
परसराम नरवडे हे बिडकीन येथे साखरपुड्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा आणि सून हे मकर संक्रांतीचे सामान खरेदीसाठी गंगापूर येथे गेले होते. घरात कोणी नसल्याचा संधी साधत चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
![कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5695143-672-5695143-1578908611747.jpg)
परसराम नरवडे हे बिडकीन येथे साखरपुड्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा आणि सून हे मकर संक्रांतीचे सामान खरेदीसाठी गंगापूर येथे गेले होते. घरात कोणी नसल्याचा संधी साधत चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातून त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 23,000 रुपेय असा एकूण 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा घेऊन पोबारा केला. परसराम नरवडे हे घरी आले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला दिली.
गंगापूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद मुंडे हे पोलीस टिमसह घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी परसराम नरोडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे करीत आहेत. या तपास प्रकरणी फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.