छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अवकाळी पावसामुळे कांदा, गहु, अद्रक, तमाटा, बटाटा, बाजरी इत्यादी पिके जमीन दोस्त झाले. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी मदतीकडे बळीराजा डोळे लाऊन बसला आहे. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार राज्यात नुकसानग्रस्त शेती भागाची पाहणी करत असून सरकार सर्वोपरी मदत देण्याचा प्रयत्न करणार आश्वासन त्यांनी दिले.
मराठवाड्यात पावसाची शक्यता: दोन दिवसांपूर्वी हवामान तज्ज्ञांनी मराठवाड्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. रविवारी दुपारनंतर अचानकच वातावरणात मोठा बदल अनुभवायला मिळाला. दुपारी कडक ऊन पडल्यानंतर, चार नंतर मात्र थंड वारे वाहू लागले. संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने हजेरी लावली.
कृषिमंत्रीनी केली नुकसानीची पाहणी: कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर या परिसरात वीस मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या ठिकाणी गहू, अद्रक, टमाटा, बटाटा, कांदा अशा पिकांचं मोठं नुकसान झाले. तर बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून एक जण ठार झाला आहे. आष्टी तालुक्यात ही घटना झाली आहे. माजलगाव भागात दोन जण जखमी झाले, वीस जनावर दगावले आहेत. केज, बीड, पाटोदा या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.