महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident in Aurangabad: अंगावर भिंत पडल्याने एकाचा मृत्यू; तिघे जखमी - भिंत कोसळली

औरंगाबादच्या हर्सूल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टँकर मागे घेताना मोठा आवाज झाला आणि घराची भिंत पडली. त्यामुळे एक तरूण मजूर ठार झाला. तर त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले.

Accident in Aurangabad
अंगावर भिंत पडल्याने एकाचा मृत्यू

By

Published : Feb 9, 2023, 9:59 AM IST

Updated : Feb 9, 2023, 10:10 AM IST

औरंगाबाद :रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्सल परिसरातील चेतनानगर येथील वीटभट्टीजवळ ही घटना घडली आहे. भावनेश नंदू पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नंदु पवार, चंदा पवार आणि योगेश पवार अशी जखमींची नावे आहेत. हर्सूल भागात चेतना नगर येथे मातीसह सिमेंटच्या विटा बनवण्याची भट्टी आहे.

अशी घडली घटना :याच भट्टीवर पवार कुटुंबीय कामाला जातात. रात्री जेवण करून ते झोपल्यानंतर मध्यरात्री एका टँकरमध्ये औष्णिक विद्युत केंद्रातून राख आणली होती. ही राख पाईपच्या माध्यमातून एका खोलीत टाकली जात होती. त्याचवेळी शेजारी कच्च्या विटांनी बनवलेल्या खोलीची एक भिंत पडली. यात खोलीत पवार कुटुंबीय झोपले होते. मृत झालेला भावनेश हा भिंतीच्या कडेला झोपलेला होता. टँकरमधून टाकण्यात आलेल्या राखीच्या दाबामुळे विट आणि सिमेंटने बनवलेल्या खोलीची ही भिंत कोसळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही भिंत पवार कुटुंबीयांच्या अंगावर पडली त्याबरोबर घरावरील पत्रे कोसळले, यात भावनेश दाबला गेला. त्याच्या आई वडील आणि भावाला ढिगाऱ्यातून नागरिकांनी बाहेर काढले, मात्र भावनेशचा त्या काळात मृत्यू झाला.

प्रमाणापेक्षा जास्त माल भरल्याने दुर्घटना :पवार कुटुंब यांनी दिलेल्या माहितीनुसार टँकरमधील केमिकलयुक्त सिमेंट पावडर खोलीत भरण्याचे काम वेगाने सुरू होते. प्रमाणापेक्षा जास्त साहित्य भरले गेल्याने मोठा आवाज झाला आणि ही दुर्घटना घडली. सर्वत्र धुरळा उडाला आमच्या अंगावर भिंत, पत्रे कोसळल्याने आम्हाला काही समजले नाही. ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुटुंबियांना काढण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ गेला. त्यामुळेच भावनेशचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी सांगितले.

जानेवारीतील घटना :नाल्याच्या काठावर असलेल्या प्राचीन दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक मजूर गंभीर जखमी झाला होता. ही दुर्घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात 22 जानेवारी रोजी सायंकाळी घडली होती. मरण पावलेले मजूर हे नाल्याचे बांधकाम करीत होते. दगडाची भिंत कोसळल्याने त्याखाली दबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर मूर्तीजापुर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषीत केले होते. तर साबिर शहा मोहब्बद शहा यांच्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा : Mumbai Crime: शाब्बास पोलिसांनो! डॉक्टर, नर्स बनून आरोपीला पकडले; अन् दगडांच्या वर्षावात 800 मीटर खेचत नेले

Last Updated : Feb 9, 2023, 10:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details