महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचा सातवा बळी, 77 वर्षीय महिलेचा मृत्यू - औरंगाबाद कोरोनाबाधित मृत्यू

किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेला सोमवारी रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेला संशयित रुग्ण म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोना अहवाल येण्याआधी महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. महिलेच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

aurangabad corona update  औरंगाबाद कोरोना अपडेट  औरंगाबाद कोरोनाबाधित मृत्यू  corona update Maharashtra
औरंगाबादेत कोरोनाचा सातवा बळी, 77 वर्षीय महिलेचा मृत्यू

By

Published : Apr 28, 2020, 6:58 PM IST

औरंगाबाद -शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. आज घाटीत उपचार घेत असलेल्या एका ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेला सोमवारी रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेला संशयित रुग्ण म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोना अहवाल येण्याआधी महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. महिलेच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिलेच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या सातवर गेली आहे, तर कोरोनाबधितांचा आकडा 105 वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा शतकपार -

औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. अवघ्या 2 दिवसांत कोरोनाचे 50 रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णसंख्या 105 वर पोहोचली आहे. सोमवारी 29 रुग्ण आढळून आल्यानंतर अचानकच रुग्णसंख्येत वाढ झाली. काही तासातच म्हणजे मंगळवारी सकाळी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर दुपारी 10 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे अवघ्या 24 तासातच 52 नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत 23 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतके दिवस ठरावीक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना आता शहरातील चार नव्या भागांमध्ये रुग्ण आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details