कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यातील धनगरवाडी (औराळा) येथील २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट बुधवारी सकाळी आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली. त्या तरुणावर सध्या कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संर्पकात आलेल्या आई, वडील, भाऊ, पती, मुलगी, आजी व जैतापूर येथील चार असे एकूण बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या दहा जणांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कन्नड़ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 वर - कन्नड़ तालुक्यात कोरोनाची लागण
धनगरवाडी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने आता तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या तीनवर पोहचली आहे.
कन्नड़
तालुक्यात प्रथमच देवळाणा येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळताच धनगरवाडी येथे रुग्ण सापडल्याने आता तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या तीनवर पोहचली आहे.