महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैठण तालुक्यात वीज कोसळून एक ठार, सहा जण जखमी - वीज कोसळून सहा जखमी

नविन विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर बुधवारी दुपारी वीज कोसळली. या घटनेत सहा जण जखमी झाले तर एक जण ठार झाला. पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारात ही घटना घडली.

one killed  six injured in lightning strike at devgaon tanda in paithan
पैठण तालुक्यात वीज कोसळून एक ठार, सहा जण जखमी

By

Published : May 14, 2020, 10:29 AM IST

औरंगाबाद - नविन विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर बुधवारी दुपारी वीज कोसळली. या घटनेत सहा जण जखमी झाले तर एक जण ठार झाला. पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारात ही घटना घडली.

देवगावतांडा येथील शेतकरी साहेबराव चव्हाण यांच्या शेतात नविन विहिरीचे खोदकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुटल्याने विहिरीवर काम करणारे मजुर बाजुला असलेल्या उभी असलेल्या बैलगाडीखाली बसले होते. त्या वेळी त्यांच्या अंगावर विज कोसळली. यामध्ये विहीर मालक साहेबराव भाऊराव चव्हाण (वय 50 वर्षे, राहणार देवगावतांडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतिष जानु राठोड (वय 25 वर्षे), अमोल तुळशीराम राठोड (वय 27 वर्षे), युवराज श्रीधर राठोड (वय 30 वर्षे), जैतालाल प्रभु चव्हाण (वय 23 वर्षे), नितेश पंढरीनाथ चव्हाण (वय 25 वर्षे), निलेश सुभाष चव्हाण (वय 20 वर्षे) सर्व राहणार एकतुनी तांडा (ता.पैठण) हे गंभीररित्या जखमी झाले.

जखमीवर आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वादळी वाऱ्याने मोसंबीची झाडे झाली भुईसपाट -

पैठण तालुक्‍यातील रांजणगाव दांडगा येथील शेतकरी किसान शेख शफीक शेख रफीक आणि शेख मुनीर शेख रफीक या दोघा भावांनी सहा एकरमध्ये मोसंबी फळबागाची लागवड केली आहे. ही झाडे जवळपास सात ते आठ वर्षांची झाली आहे. मात्र मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे यामधील जवळपास एक एकरातील झाड उखडून भुईसपाट झाली आहे. यामुळे हे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पोटच्या लेकरांप्रमाणे जोपासलेली मोसंबी झाड वादळी वाऱ्यात भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या झाडांची सरकारने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details