औरंगाबाद - भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
सुरेश अर्जून जाधव (वय 35 रा.कचनेर) हे दुचाकीने औरंगाबादच्या दिशेने येत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझरने (एमएच १५ डीएस ८१६४) धडक दिली. यात सुरेश जाधव हे गंभीर जखमी झाले. निपाणी येथील सचिन डोईफोडे, नवनाथ भालेकर, विकास घोडके, ज्ञानेशवर गव्हारे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.