औरंगाबाद- पुणे-औरंगाबाद महामार्गावर शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात भेंडाळा गावाजवळ घडला.
पुणे-औरंगाबाद महामार्गावर अपघात; कारच्या धडकेत एक ठार, तीन जखमी - पुणे-औरंगाबाद महामार्ग
औरंगाबादहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने भेंडाळाहून औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एक जण ठार असून कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत.
![पुणे-औरंगाबाद महामार्गावर अपघात; कारच्या धडकेत एक ठार, तीन जखमी पुणे-औरंगाबाद महामार्गावर अपघात , pune aurangabad highway , पुणे-औरंगाबाद महामार्ग , aurangabad accident news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11264293-495-11264293-1617444320212.jpg)
औरंगाबादहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने भेंडाळाहून औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एक जण ठार असून कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समाजसेवक अनंता कुमावत व स्थानिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी असलेल्या संदीप एकनाथ काटकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथील डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -तारापूरमध्ये बजाज हेल्थ केअर कंपनीला भीषण आग