औरंगाबाद - जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1361 स्वॅबपैकी 159 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आज सकाळी प्राप्त झालेल्य अहवालात 79 पुरुष, 80 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8108 वर गेली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 4463 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 342 जणांचा मृत्यू झाला असून 3303 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळी प्राप्त अहवालात मनपा हद्दीतील रुग्ण 112 रुग्ण आहेत. ज्यामध्ये नक्षत्रवाडी (2), एन अकरा, सिडको (2), हर्सूल कारागृह परिसर (1), मुकुंदवाडी (1), कांचनवाडी (1), अन्य (2), राम नगर,चिकलठाणा (1), पडेगाव (3), विद्यापीठ गेट परिसर (1), उथर सो., हर्सुल (2), नवनाथ नगर (7), नवजीवन कॉलनी (2), रेणुका माता मंदिर परिसर (1), राजे संभाजी कॉलनी (2), राम नगर (6), छावणी (6), एन अकरा हडको (3), हर्सुल (1), बाबर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (8), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (1), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (1), प्रगती कॉलनी (1), एन बारा, हडको (1), किराणा चावडी (1), कोकणवाडी (2), काल्डा कॉर्नर (1), ज्योती नगर (1), द्वारकापुरी (1), पद्मुपरा (1), जयसिंगपुरा (1), श्रद्धा कॉलनी (1), हनुमान नगर (1), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (1), मीरा नगर, पडेगाव (1), गजानन नगर (1), विष्णू नगर (9), दौलताबाद टी पॉइंट परिसर (3), एन नऊ सिडको (1), एन सहा सिडको (7), हनुमान नगर (2), माऊली नगर, हर्सुल (1), हिमायत बाग (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), रामकृष्ण नगर, गारखेडा (1), उल्का नगरी (2), जय भवानी नगर (1), नारेगाव (3), अरिहंत नगर (1), लॉयन्स हॉस्पीटल परिसर (2), पुंडलिक नगर (3), बजाज सो., सातारा परिसर (1), ठाकरे नगर, सातारा परिसर (1), माऊली नगर (1) या भागातील रुग्ण आहेत.