महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gutkha took life : गुटखा खाताना ठसका लागल्याने एकाचा मृत्यू - betel nut stuck in the throat

गुटखा खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले (Gutkha took life ) गुटखा खाल्यानंतर त्याला अचानक ठसका लागला. यातच गुटक्यातील सुपारी त्याच्या घशात अडकली (betel nut stuck in the throat) आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची (One dies while eating gutkha ) दुर्दैवी घटना घडली. गणेश वाघ असे त्या तरूणाचे नाव आहे.

गणेश  वाघ
गणेश वाघ

By

Published : Mar 12, 2022, 11:36 AM IST

औरंगाबाद:गुरुवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी गणेश जगन्नाथदास वाघ या 37 हे गेल्या 20 वर्षांपासून राहुल साहुजी यांच्याकडे कामाला होते. साहुजी यांच्या घरी डिश टिव्ही बसवायला जाण्यापुर्वी त्यांनी गुटखा खाल्ला. काम करताना अचानक ठसका लागल्यामुळे ते बेशुद्ध पडले. साहुजी यांच्या घरातील सदस्यांनी इतरांच्या मदतीने तातडीने गणेश त्यांना घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तपासणीत गुटखा खाताना खोकला आल्याने सुपारी घशात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details