महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकी-मालवाहू मोटारीचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी - औरंगाबाद अपघात बातमी

औरंगाबाद-धुळे महामार्गावरील टापरगाव शिवारात मोटारसायकल व मालवाहू मोटारीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Jan 10, 2021, 10:02 PM IST

कन्नड (औरंगाबाद)- तालुक्यातील टापरगावजवळ मालवाहू मोटार व मोटारसायकल यांच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गवर टापरगाव शिवारात मोटारसायकलीवरुन (क्र. एम एच २० सी ई ७२३७) जगन्नाथ भानुदास थोरात (वय ४८ वर्षे), राजू सुखदेव थोरात (दोघे रा. देभंगाव) हे दोघे देभेगावकडून कन्नडकडे जात होते. त्याचवेळी समोरुन येणारी मालवाहू मोटार (क्र. एम एच २० ई एल ०६१०)ने मोटारसायकलीस धडक दिली. यात मोटारसायकलस्वार जगन्नाथ थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. राजू थोरात हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details