औरंगाबाद- परभणीहून कन्नडकडे जाणाऱ्या कारने पहाटे चार वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खुलताबादजवळ हिमरू शोरूमच्या शेजारील झाडाला जोरदार धडक दिली. यात कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अवेस अकबर रंगरेज (वय-18 रा सिद्दीकी चौक, कन्नड) असे मृत युवकाचे नाव आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावर कारची झाडाला धडक; युवक जागीच ठार, दोघे किरकोळ जखमी - CAR
अवेस अकबर रंगरेज (वय-18 रा सिद्दीकी चौक, कन्नड) असे मृत युवकाचे नाव आहे.

कन्नडमधील सिद्दीक चौक येथील राहणारे अवेस अकबर रंगरेज, वसीम अकबर रंगरेज, अरबाज अफजल रंगरेज हे खासगी कामानिमित्त कारने (क्र. एमएच.20 डीव्ही. 0886) परभणी येथे गेले होते. परत कन्नडकडे येत असताना खुलताबाद - औरंगाबाद रोडवरील हिमरू शोरूमजवळील झाडाला पहाटे चार वाजता जोरदार धडक दिली. कारचालकाशेजारी बसलेला अवेस अकबर रंगरेज याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृत अवेस रंगरेज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.