औरंगाबाद - दुबईहून आलेले दोन प्रवासी कोरोनाची चाचणी न करताच जम्मू-काश्मीरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिंसी भागात हे दोन्ही नागरिक राहात होते. शहरात दाखल होत असताना त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालून तपासणी न करताच शहरात प्रवेश केला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
दोन्ही नागरिक जम्मू काश्मीरला गेले निघून -
Omicron variant : दुबईहून औरंगाबादला आलेले दोन प्रवाशी कोरोना तपासणी न करताच जम्मू-काश्मीरला गेले
दुबईहून आलेले दोन प्रवासी कोरोनाची चाचणी न करताच जम्मू-काश्मीरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिंसी भागात हे दोन्ही नागरिक राहात होते. शहरात दाखल होत असताना त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालून तपासणी न करताच शहरात प्रवेश केला होता.
चार दिवसांपूर्वी दोन जण दुबईवरून औरंगाबादेत दाखल झाले. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानुसार ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विदेशातून आलेल्या नागरिकांची RT-PCR टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याबाबत दोघांना कल्पना देण्यात आली. मात्र या दोघांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी RT-PCR टेस्ट न करण्यासाठी वाद घातला आणि नंतर जम्मू- काश्मीरला पलायन केले. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रशासकीय यंत्रणेला कळवल्याचे सांगितले.
या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन आता यापुढे तपासणी करण्यास नकार देणाऱ्या किंवा वाद घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तपासणी करणे आपलं कर्तव्य आहे, याबाबत नागरिकांना जाणीव असावी, असं न केल्यास समाजाला घातक ठरू शकते. त्यामुळे यापुढे जिल्हा प्रशासन कठोर निर्णय घेऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.