औरंगाबाद - मित्रासोबत दुचाकीवरून घराकडे निघालेल्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कपल्याची घटना टाऊन हॉल येथील उड्डाणपुलासमोर घडली. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेख रईस शेख मुनीर (वय ३०, रा. आरेफ कॉलनी) हा मित्रांसोबतदुचाकीने भडकल गेटहून घराकडे जात होता. त्याचवेळी टाऊन हॉल उड्डाणपुलावर नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला आवळून तो दुचाकीवरून खाली पडला. हे पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले. त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नायलॉन मांजाची सर्रास विक्री
शहरात नायलॉन मांजा विक्री व बाळगण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांकडून वारंवार आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र बंदी असलेला हा नायलॉन माझ्या शहरात सहजरीत्या उपलब्ध आहे. नायलॉन मांजामुळे रोज अपघात होत आहे. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.