औरंगाबाद -आईनेच आपल्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना समोर आली. आशा दीपक गायकवाड (वय ३२), ऋतुजा गायकवाड (वय१२) अशी मृत माय-लेकीचे नावे आहेत. औरंगाबादच्या विठ्ठल नगर, म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या तोरणागड येथे राहत्या घरी आशाने आत्महत्या केली.
मुलीची हत्या करुन परिचारिकेची आत्महत्या; कारण अस्पष्ट - परिचारिकेची आत्महत्या
मुलीची हत्या करून परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणाची मुकुंदवाडी पोलिसात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
आशा गायकवाड व ऋतुजा गायकवाड या माय-लेकी तोरणागड मध्ये राहत होत्या. आशा या खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. शनिवारी सायंकाळी त्यांच्या भावाने त्यांना फोन केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांच्या भावाला आणि कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी आशाच्या घरी धाव घेतली. त्यावेळी धक्कादायक चित्र त्यांना दिसले. आशा आणि तिची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. आशाच्या हातात एक इंजेक्शन होते. त्यावरून घडलेल्या घटनेचा अंदाज आला. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना याघटनेची माहिती दिली. आणि दोघींना घाटी रुग्णालयात नेण्यात आले.
तपासणी दरम्यान ऋतुजा गायकवाडचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर आशा बेशुद्ध होती तिच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचाही मृत्यू झाला. आशाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार आशा आणि तिचा पती दीपक यांच्यात कौटुंबिक वाद होते त्यामुळे ती अनेकवेळा ती अस्वस्थ असायची त्यातूनच तिने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात प्रकरणी नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.