औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 77 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 72 तर ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 37 पुरूष तर 40 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7 हजार 17 कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 3 हजार 571 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच 318 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3 हजार 128 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 725 स्वॅबपैकी आज 77 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील 72 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात घाटी परिसर (1), बेगमपुरा (4), सुरेवाडी (1), पिसादेवी, गौतम नगर (3), बड्डीलेन (2), जटवाडा रोड (3), कांचनवाडी (1), आंबेडकर नगर,एन सात (20), सातारा परिसर (4), विष्णू नगर (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर (11), विशाल नगर (1), गौतम नगर (1), लोटा कारंजा (2), नागेश्वरवाडी (3), नारळीबाग (6), एकनाथ नगर (3), चेलिपुरा काझीवाडा (2), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (1) तर ग्रामीण भागात 5 नवे रूग्ण आढळून आले आहे ज्यात हतनूर, कन्नड (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
औरंगाबादमध्ये जवळपास एक महिन्यानंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट; 77 नवीन रुग्णांची नोंद - aurangabad corona patient
आतापर्यंत एकूण 7 हजार 17 कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 3 हजार 571 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच 318 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3 हजार 128 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 725 स्वॅबपैकी आज 77 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
घाटी रुग्णालयात पडेगाव येथील 55 वर्षीय पुरूषाचा, एसटी कॉलनीतील 71 वर्षीय स्त्री, अजिंठा येथील 70 वर्षीय महिलेचा, जालना येथील म्हाडा कॉलनीतील 37 वर्षीय पुरूषाचा, एन 11 हडको येथील 53 वर्षीय पुरुषाचा, जाधववाडी येथील 53 वर्षीय महिलेचा, एन 9 सिडको येथील 60 वर्षीय पुरूषाचा तर न्यु हनुमान नगर येथील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात राजा बाजार येथील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 318 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.