महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या दोन हजार पार, सकाळपर्यंत 64 रुग्णांची वाढ - औरंगाबादेत कोरोना महत्त्वाची बातमी

गेल्या पाच दिवसांमध्ये रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. शनिवारी गेल्या अडीच महिन्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्या 100 ने वाढली आहे. तर मृतांची संख्या शंभराच्या काठावर गेली आहे. आता पर्यंत 99 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या दोन हजार पार
औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या दोन हजार पार

By

Published : Jun 7, 2020, 10:47 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात रविवारी सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 14 झाली आहे. यापैकी 1 हजार 184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 731 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भावसिंगपुरा (1), बजाजनगर, वाळूज (1), हीना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ, रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्त‍िया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या पाच दिवसांमध्ये रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. शनिवारी गेल्या अडीच महिन्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्या 100 ने वाढली आहे. तर मृतांची संख्या शंभराच्या काठावर गेली आहे. आतापर्यंत 99 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details