महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 2806 वर ; 50 नव्या रुग्णांची भर - aurangabad corona update count

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 806 झाली आहे. यापैकी 1 हजार 502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन दिवसांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

By

Published : Jun 15, 2020, 11:45 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 50 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. तर, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 806 झाली आहे. यापैकी 1 हजार 502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 154 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सोमवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नारेगांव (1), पवन नगर, टीव्ही सेंटर (2), एस.टी. कॉलनी एन-2 (1), गल्ली नं. 4 गजानन नगर (4), सूतगिरणी गारखेडा परिसर (1), नवजीवन कॉलनी एन-11 (1), एन-8 सिडको (3), मोतीवाला नगर (1), एन-9 सिडको (1), कोतवालपुरा (1), आझाद चौक (1), मंजुरपुरा (1), आसेफिया कॉलनी (1), नूतन कॉलनी (1), एन-6 सिडको (2), सिटी चौक (1), गुलमंडी (1), कैलास नगर (1), मिल कॉर्नर (1), बजाजनगर (2), अंबिका नगर (5), आंबेडकर नगर (6), हर्सुल परिसर (2), बारी कॉलनी (1), सिव्हील हॉस्पिटल परिसर (1), जयसिंगपुरा (1), छावणी (1), दुधड (4),‍ अन्य (1) या भागांतील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 स्त्री व 32 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 6 रुग्णांचा मृत्यू -

  • औरंगाबाद शहरातील मयूर नगरातील 71 वर्षीय पुरुष रुग्ण
  • 13 जूनला रोशन गेट बारी कॉलनी येथील 62 वर्षीय स्त्री रुग्ण
  • 14 जूनला सकाळी 10.30 वाजता जहांगीर कॉलनीतील 55 वर्षीय पुरुष रुग्ण
  • बारी कॉलनीतील 52 वर्षीय पुरुष रुग्ण
  • सिडकोतील एन-6 मधील साई नगरातील 58 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्ण
  • रेल्वेस्टेशन परिसरातील सिल्क मिल कॉलनीतील 52 वर्षीय पुरुष रुग्ण

आतापर्यंत घाटीत 111, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 38, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 150 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details