महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA VIRUS : आता औरंगाबादेत होणार कोरोनाची चाचणी, घाटीत तपासणी लॅब सुरू

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना चाचणीची सुविधा राज्यातील काही मोजक्याच रुग्णालयात होत होती. त्यामुळे अहवाल प्राप्त होण्यास उशीर लागत असल्याने रुग्णांवर उपचारास विलंब होत होता. आता औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना चाचणीस सुरूवात झाल्याने रुग्णांचे घेतलेले नमुने चाचणीसाठी पुण्यास पाठवण्याची आवश्यकता नाही. यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे.

corona test lab start in ghati hospital aurangabad
औरंगाबादेत होणार कोरोनाची चाचणी

By

Published : Mar 29, 2020, 5:27 PM IST

औरंगाबाद - कोरोना विषाणूची चाचणी आता औरंगाबादेत करण्याचा मार्ग मोकळा झाला असून नमुने तपासणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचे घेतलेले नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे रुग्णांचा तपासणी अहवाल एका दिवसात मिळणार असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले जायचे. त्यामुळे त्याचा अहवाल येण्यास जवळपास तीन दिवसांचा कालावधी लागायचा. औरंगाबादला चाचणी सुरू झाल्याने औरंगाबादसह आसपासच्या जवळपास काही जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

औरंगाबादेत होणार कोरोनाची चाचणी
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीसाठी अत्यावश्यक यंत्रसामुग्री लावण्यात आली असून पाहिल्यादिवशी दोन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. औरंगाबादमधे आतापर्यंत 97 जणांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 86 अहवाल प्राप्त झाले असून एकच अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला होता. इतर सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काही अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. ज्या महिला प्राध्यापकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, ती महिला आता बरी झाली असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ९००हून आधिक जणांना घरीच कॉरेंटाईन करण्यात आले आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातून 218 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. औरंगाबाद आणि इतर ठिकाणी संशयित रुग्णांची संख्या पाहता औरंगाबादमध्ये तपासणीची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार घाटी रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या लॅबमुळे संशयितांची तपासणी अहवाल एका दिवसात मिळणार असल्याने त्यांच्यावर लवकर उपचार सुरू करण्यास मदत होईल, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details