औरंगाबाद - 20 टक्के अनुदान असणाऱ्या सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षकांना वेतन मिळावे, या मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन केले. सर्व विनाअनुदानित शाळा बंद ठेऊन 3 हजार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेवरही या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.
विविध मागण्यांसाठी मराठवाड्यातील तीन हजार शिक्षकांचा बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार - बोर्ड परिक्षांवर शिक्षकांचा बहिष्कार
विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांवरही या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.
![विविध मागण्यांसाठी मराठवाड्यातील तीन हजार शिक्षकांचा बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार शिक्षक आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5929324-thumbnail-3x2-demand.jpg)
हेही वाचा - जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने राज्यातील नऊ विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 20 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, सेवा संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकड्यांना देय असलेल्या अनुदानाचा टप्पा लागू करावा, यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी बोर्ड परीक्षांवर शिक्षकांनी बहिष्कार घातला. याबाबत एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर करण्यात आले आहे.