औरंगाबाद -उन्हाच्या झळा सर्वत्र बसत ( Summer In Aurangabad ) आहेत. त्याचबरोबर पाण्याची टंचाई अनेक ठिकाणी भासत आहे. त्यात मराठवाडा नेहमी टँकरवाडा म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी पाण्याची टंचाई नागरिकांना ( Water Scarcity ) जाणवणार नाही, असे चित्र आहे. कारण जायकवाडी धरणात पुढील सहा ते सात महिने पुरेल ( Jayakwadi Dam Water Storage ) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
अति पावसामुळे धरण भरले -मराठवाड्यासाठी उपयुक्त असलेले जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाण्याचा अनुशष भरून काढण्यात मदत होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त असलेल्या भागात पाण्याची टंचाई म्हणावी तशी जाणवत नाही. आशिया खंडातील सर्वात मोठ मातीच 103 टीएमस क्षमता असलेलं धरण म्हणून परिचित असलेल्या जायकवाडी धरणात यावर्षी धरणात जवळपास 65.70% टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने औरंगाबादसह जालना, बीड जिल्ह्याचा काही आणी, गोदावरी नदी काठची आणि धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई भासणार नाही. एकदा धरण शंभर टक्के भरले की दोन वर्षे पाणी पुरेल, असे म्हणले जाते. म्हणून यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती राहील, असे तज्ञाचे मत आहे.