औरंगाबाद - राज्यातील छोट्या उद्योगांना चालना देण्याचे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे, यापुढे वीज बिलातील किमान आकारणी रद्द करण्याबाबत सूचना केल्या असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत दिली.
माहीती देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई लघुउद्योग अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मोठ्या उद्योगांसमोर आव्हानं आहेत मात्र, छोटे उद्योग तातडीने चालू होऊ शकतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी केंद्राच्या काही योजना येत आहेत. राज्यदेखील आपल्या परीने मदत करणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.
औरंगाबादच्या काही उद्योजकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयूष गोयल यांच्याशी लघुउद्योगांना चांगले पॅकेज आणि सवलती दिल्या पाहिजे याबाबत चर्चा करण्यात आली असे देसाई म्हणाले. उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात उद्योग सुरू व्हावेत यासाठी मागच्या 17 तारखेपासून वेगवेगळे परिपत्रक काढून सूट दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू झाले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कामगारांसाठी काही सवलती आम्ही दिल्या, असेही त्यांनी सांगितले.
लघु उद्योगाजकांसाठी वीजबिलबाबत किमान शुल्क आकारणी रद्द करा, असा प्रस्ताव आम्ही वीज विभागाला पाठवला होता. तो त्यांनी मंजूर करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे निश्चित राज्यात उद्योग उभारणीबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. आजपर्यंत उद्योजकांनी आम्हाला सहकार्य केले असेच सहकार्य पुढे अपेक्षित असल्याचेही उद्योगमंत्री देसाई यावेळी बोलताना म्हणाले.