औरंगाबाद - केंद्रीय अर्थराज्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची बैठक ताज हॉटेल येथे आयोजित करण्यात आली. केंद्रीय मराठवाड्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय बँकाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत येथे मंथन परिषदेचे आयोजन करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ऑनलाइन पद्धतीने बैठकीमध्ये सहभाग घेतला.
राष्ट्रीय बँक परिषदेचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले. सबका साथ सबका विकास हेच आमचे ध्येय असल्याचे यावेळी सीतारामन यांनी सांगितले. महाराष्ट्रच्या मराठवाडा भागातील लोकांना आर्थिक मदतीची व विकासाची गरज आहे. कराड यांनी उत्तम आयोजन केले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
सबका साथ सबका विकास हेच आमचे ध्येय
हेही वाचा-निवडणूक आयोग हा स्वतंत्र, मात्र कोणताही घटक नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी - उपमुख्यमंत्री
या मुद्द्यांवर होणार बैठकीत चर्चा
मंथन बैठकीत आम्ही काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. जनधन योजना आणि तिच्या व्याप्तीबाबत चर्चा करणार आहोत. या योजनेतून आतापर्यंत 43 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. तर मुद्रा लोबाबत ही लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यात काही अडचणी आहेत. यासाठीही आज बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना जे 10 हजाराचे पंतप्रधान योजनेतून कर्ज दिले जाते. त्यावर सुद्धा बैठकीत चर्चा होईल. डिजीटल इकॉनॉमी वाढवण्यासाठी मंथन करणे गरजेचे आहे. त्यावरही आज मंथन करणार असल्याचे कराड यांनी सांगितले.
हेही वाचा-गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!
संध्याकाळी जाहीर होणार निर्णय-
शेतीच्या प्रश्नावर, नाबार्डचे अधिकारी आणि नीती आयोगाचे अधिकारीसुद्धा यासाठी आले आहेत. दिवसभर या मुद्द्यांवर चर्चा होईल. संध्याकाळी काही निर्णय जाहीर करण्यात येईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.
हेही वाचा-संपूर्ण विचार करूनच अध्यादेश काढण्याचा निर्णय, याला कुणाचा विरोध का असावा, माहिती नाही - अशोक चव्हाण