औरंगाबाद -जिल्ह्यात आज सकाळी 90 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. हर्सूल कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे. कारागृहातील 29 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1936 झाली आहे.
शनिवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पिंपळगाव देवशी, गंगापूर (1), भवानी नगर (2), राधास्वामी कॉलनी (1), भारतमाता नगर, एन 12 (1), हर्सुल परिसर (1), गारखेडा परिसर (3), मिल कॉर्नर (2), अहिंसा नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), आकाशवाणी परिसर (1), न्याय नगर (1), कैलास नगर (1), आंबेडकर नगर (2), एन 11 टी.व्ही सेंटर (2), एन आठ, सिडको (2), रोशन गेट (5), बीड बायपास रोड (1), हुसेन कॉलनी (3), हनुमान नगर (1), गादिया विहार, शंभू नगर (1), तोफखाना, छावणी (1), पीर बाजार उस्मानपुरा (3), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जुनी मुकुंदवाडी (1), संजय नगर (2), पद्मपुरा (1), समता नगर (1), युनुस कॉलनी (1), जुना बाजार (1), जय भीम नगर (1), गौतम नगर (1), नॅशनल कॉलनी (2), लेबर कॉलनी (3), देवडी बाजार (1), वेदांत नगर (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), पैठण गेट (1), रेहमानिया कॉलनी (1), पिसादेवी रोड (1), हर्सूल जेल (29), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 69 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.