औरंगाबाद - नागरिकांना लस घेणे सोयीचे व्हावे याकरिता आता रात्रीचे लसीकरण सुरू करण्यात आले असून जिल्ह्यात सात ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. लसीकरण केंद्र सायंकाळी सुरू नसल्याने चाकरमान्यांना लस घेण्यासाठी अडचणी येत असल्याच दिसून आले. परिणामी लसीकरणाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रात्रीच्या लसीकरणाचा राज्यातील पहिला प्रयोग जिल्ह्यात राबवण्यात आला. त्याला प्रतिसाद मिळाल्याने सात केंद्र सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
औरंगाबादेत सात ठिकाणी रात्रीचे लसीकरण; राज्यातील पहिला प्रयोग - रात्रीचे लसीकरण
लसीकरण केंद्र सायंकाळी सुरू नसल्याने चाकरमान्यांना लस घेण्यासाठी अडचणी येत असल्याच दिसून आले. परिणामी लसीकरणाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रात्रीच्या लसीकरणाचा राज्यातील पहिला प्रयोग जिल्ह्यात राबवण्यात आला. त्याला प्रतिसाद मिळाल्याने सात केंद्र सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
धर्मगुरू करणार जनजागृती -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्हीसीद्वारे औरंगाबाद जागतिक पातळीवरील पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी लसीकरण अधिक वाढविण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. चीन, रशियात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तशी जिल्ह्यात येऊ नये. जिल्ह्याचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सर्वांनी सर्वांना लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी धर्मगुरू यांना केले. शाळेतील पाल्य, त्यांचे पालक यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. जनजागृती, शिबिरे, कॉर्नर बैठका, प्रेरणादायी व्याख्याने, दवाखान्याची वेळ निश्चित करणे, फिरते वाहनाद्वारे जनजागरण, वकील, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, मंगल कार्यालये आदींनी लसीकरणासाठी आग्रही असणे आवश्यक असल्याच्या सूचना धर्मगुरूंनी प्रशासनाला केल्या. त्यानुसार सूचना केल्याच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.