औरंगाबाद- कोरोनाची बदलती स्थिती लक्षात घेता औरंगाबाद जिल्ह्यात नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. सोमवारी याबाबत आढावा बैठक घेण्यात येईल. त्यावेळी पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लवकरच औरंगाबादेत नवीन नियमावली- जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत - औरंगाबाद कोरोना न्यूज
शहर आणि जिल्ह्याच्या प्रवेश नाक्यावरील चाचणी केंद्रे सुरू ठेवावीत. फैलाव अधिक प्रमाणात ज्यांच्यापासून होऊ शकतो, अशा सुप्रर स्प्रेडर हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी यासह सर्व संबंधितांनी प्राधान्याने चाचण्या आणि लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे
सतर्कता बाळगणे आवश्यक
राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण आढळत आहेत. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात या व्हेरीएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉईंट (चेक नाके) वर आरटीपीसीआर चाचण्या कडक करण्यात येणार असून चाचणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा आता लेवल तीनमध्ये
राज्य शासनाच्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्हा ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक तत्वानुसार लेवल तीनमध्ये आहे. लेवल ३ मधील मार्गदर्शक तत्वानुसार दुकाने तसेच सर्व खाजगी आस्थापणांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सोमवारी होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर निर्बंधांबाबत अंतीम निर्णय होईल.
प्रवेश नाक्यावर सुरू राहतील तपासणी केंद्रे
शहर आणि जिल्ह्याच्या प्रवेश नाक्यावरील चाचणी केंद्रे सुरू ठेवावीत. फैलाव अधिक प्रमाणात ज्यांच्यापासून होऊ शकतो, अशा सुप्रर स्प्रेडर हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी यासह सर्व संबंधितांनी प्राधान्याने चाचण्या आणि लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी अन्न औषध प्रशासन, आरटीओ, उत्पादन शुल्क, वजनमापे यासह सर्व संबंधित यंत्रणांनी पाहणी करुन याबाबींवर नियंत्रण ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे तसेच रुग्णालयांचे इलेक्ट्रीक ऑडीटचे अहवाल ही सादर करण्याचे निर्देश संबंधितांना जिल्हाधिकारी यांनी दिले.